द्राक्ष बटाटा भाजी \ Black Grapes and Potatoes Curry

लागणारा वेळ:

१.५ तास

 

 

Drax Batata Bhaji served

लागणारे जिन्नस:

१) लिंबाएवढ्या आकाराचे (म्हणजे ३ सेमी व्यासाचे ) बटाटे, ६

२) तेवढ्याच आकाराचे कांदे,६

३) तीन मोठे टोमॅटो

४) रताळे, लाल भोपळा, कोहळा यापैकी एकाच भाजीच्या फोडी, कपभर

५) अर्धा कप बारिक चिरलेली कोथिंबीर

६) एक कपभर काळी द्राक्षे,

७) चार सहा मिरीचे दाणे, एखादी हिरवी वेलची.

८) चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट, हळद, हिंग, साखर, गरम वा काळा मसाला वगैरे

९) तेल अर्धा कप,(आवडीप्रमाणे कमी चालेल ) शक्यतो मोहरीचे. (घटकांबद्दल अधिक टिपा पहा.)

 

क्रमवार पाककृती:

१) बटाटे स्वच्छ धूवून घ्या, ते न सोलता त्यांना भरल्या वांग्यासाठी देतो, तश्या दोन चिरा द्या.

२) कांदे सोलून, मूळाकडचा भाग पूर्ण न कापता, त्यांनाही बटाट्याप्रमाणे चिरा द्या

३) कांदे व बटाटे, एका जाड बूडाच्या पातेल्यात रचा.

४) त्यावर रताळे, भोपळा वा कोहळा, यांच्यापैकी जे वापरणार आहात त्याच्या बरिक फोडी पसरा.

५) टोंमॅटो बारीक चिरुन एका ताटात घ्या. त्यात तिखट, मीठ, हळद, व बाकिचे मसाले टाका.

६) मीठ घालताना, पूर्ण पदार्थाला लागेल एवढे घालायचे आहे, पण अंदाजापेक्षा जरा कमी घाला, लागलेच तर मग घालता येईल.

७) टोमॅटोला ५ मिनिटांनी पाणी सूटेल, तसे सुटले कि त्या पाण्यासकट सर्व मिश्रण भाज्यांवर घाला.

८) वरुन तेल ओता.

९) त्यावर द्राक्षे पसरुन घाला.

Drax Batata Bhaji assembled

 

 

 

 

 

१०) झाकण ठेवून हे सर्व मंद आचेवर ठेवा

११) दहा बारा मिनिटांनी, सर्व मिसळून असे दिसू लागेल

 

Drax Batata Bhaji half done

 

 

 

१२) आता अलगद हातांनी सर्व नीट ढवळून घ्या, आणि मंद आचेवरच शिजू द्या.

१३) एखाद्या टूथपिकने बटाटे शिजलेत कि नाहीत ते बघा.

१४) आवश्यक वाटले तर मीठ टाका. (हि भाजी चोरटी होत नाही.)

१५) तेल दिसू लागले कि आच बंद करा.

१६) भात वा चपाती बरोबर खा.

 

वाढणी/प्रमाण:

चार ते सहा जणांसाठी

अधिक टिपा:

पार्टीसाठी अगदी योग्य डिश आहे ही. शिजत आल्यावर या भाजीला अप्रतिम दरवळ सुटतो. अनेक पाककृतिंना कुठला ना कुठला पारंपारीक आधार असतोच. पण ही भाजी मात्र पूर्णपणे स्वकल्पित व स्वनिर्मित. एके दिवशी सहज प्रयोग करता, हे रसायन जमून गेले.

आता : घटकांविषयी १) द्राक्ष : आपल्याकडे जी काळी द्राक्षे मिळतात ती या पदार्थासाठी अगदी योग्य. (पण जरा आंबट असावीत.) मला मिळालेली साऊथ आफ्रिकन, नुसतीच गोडमिट्ट होती, म्हणून मी थोड्या क्रॅनबेरीज वापरल्या आहेत. द्राक्षाच्या जागी मला वाटते, आंबटसर अननस, प्लम्स (आलू बुखार), हिरवी सफरचंदे वगैरे वापरता येतील. अर्थात जरुरीप्रमाणे साले व बिया काढून.
२) रताळे वगैरे… शिजून गाळ होणारी कुठलीही भाजी वा केळे चालेल. या भाजीची ग्रेव्ही हि कांद्यपासून न होता, या भाजीपासून होते. म्हणून आवश्यक आहे.
३) मोहरीचे (म्हणजेच सरसोचे वा मष्टर्डचे ) तेल मला कल्पना आहे, सगळ्यात मोठा आक्षेप या घटकाला असणार. विश्वास ठेवा, या रसायनात या तेलाचा उग्र वास पूर्णपणे मारला जातो. योग्य तो स्वाद येण्यासाठी, हे तेल मला आवश्यक वाटते. पण समजा वापरायचे नसेल, तर कुठलेही तेल वापरा पण घटक पदार्थात, एक दोन चमचे मोहरी, जरा खरंगटून घाला.

बाकी ही भाजी, मी अधून मधून करतच असतो. आज मला छोटे कांदे मिळाले नाहीत, म्हणून मोठ्या कांद्याच्या मोठ्या फोडी वापरल्यात.

 

Black Grapes and Potatoes Curry

It was just by trial, I created this dish. I am not sure, if this kind of curry is made anywhere. Many of my friends, have tried this recipe and have admired it. It was a party hit, as informed by many of them.

 

The ingredients are common but may be the combination and the way they are cooked, must be creating the magic.

 

You will need

1) 6 lemon sized potatoes

2) 6 lemon sized onions

3) 3 medium sized, red tomatoes

4) 1 cup cubes of pumpkin / butternut / sweet potato / ash guard etc. ( Any vegetable which will disintegrate on cooking, but won’t have any strong flavor of its own. )

5) ½ cup finely chopped coriander

6) 1 cup black grapes (should not be too sweet)

7) 4/6 black pepper corns

8) 1 green cardamom

9) Salt to taste

10) 3 teaspoon red chili powder

11) 1 teaspoon turmeric

12) ½ teaspoon asafetida

13) 1 teaspoon sugar

14) 2 teaspoon kaLa masala or 1 teaspoon garam masala

15) ½ cup mustard oil ( If you do not have mustard oil, add two teaspoon mustard seeds, slightly roasted and crushed, to the dish, while cooking.)

 

 

Method –

1) Wash the potatoes give two deep cuts in them, without separating the pieces.

2) Similarly peel and cut the onions.

3) Take a heavy duty pan and arrange the cut potatoes and onions in it.

4) Spread the cubes of pumpkin / butternut / sweet potato / ash guard etc. on them.

5) Chop the tomatoes into small pieces and sprinkle the salt, turmeric, chili powder and other spices on them. ( Use salt for the entire dish, but slightly less than what you feel. It can be added later, if needed.)

6) Wait for 5 minutes and spread the tomato mixture over vegetables in the pan.

7) Pour the oil over it.

8) Spread the grapes on it.

9) Cover the pan and keep it on very low flame.

10) After 10/12 minutes, remove the lid and stir gently.

11) Insert a tooth pick in a potato and check if they are cooked.

12) Check the salt and continue cooking on slow fire, till oil separates.

 

You can enjoy this curry with rice or any roti.

 

This curry tastes great. It has been tried by many of my friends. Grapes can be replaced by plums, pineapple or cooking apples. Each variation will taste different.

 

 

 

 

 

 

 

3 thoughts on “द्राक्ष बटाटा भाजी \ Black Grapes and Potatoes Curry

  1. Hi Dinesh Da,

    so awesome to see that you started your blog!

    Draksha Batata bhaji is one of my all time favorites. I have prepared many many times.
    Did not have account on Maayboli so could not tell you how much I liked the flavors, but now I can 🙂

    Looking forward to see all your repertoire of recipes here! Thanks again for starting the blog!

    Like

Leave a comment